खा.तटकरे यांनी घेतला विकासकामांचा आढावा… अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अधिकारी वर्गाला सूचना…

0
67

 श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):-

श्रीवर्धन उपविभागीय कार्यालयात 29 डिसेंबर रोजी तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खा.सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली.बैठकीला उप विभागीय अधिकारी महेश पाटील, तहसिलदार महेंद्र वाकलेकर,उप विभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे,विविध विभागांचे अधिकारी, सरपंच,विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ इ.उपस्थित होते… खा.तटकरे यांनी सार्वजनिक बांधकाम, महावितरण,जलजीवन,दिघी पोर्ट, भूमी अभिलेख कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, एस.टी.महामंडळ व अन्य कार्यालयांची वेगवेगळ्या विकास कामांची सद्यस्थिती काय आहे व अपूर्ण कामांसाठी काय करणे आवश्यक आहे…याबद्दल अधिकारी वर्गाला सूचना दिल्या.बाॅक्साईट उत्खनन विषयी,दिघीपोर्ट संबंधी उपस्थित स्थानिकांच्या भावना अधिक तीव्र असल्याचे दिसून आले…