खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
रविवार दि.29 डिसेंबर रोजी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय, खोपोली येथील पटांगणात पत्रकार तय्यब खान आणि आकाश जाधव यांच्या अनोख्या संकल्पनेने मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील खोपोली पत्रकार क्रिकेट संघामार्फत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते… आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट सामन्यांमध्ये केटीएसपी मंडळ शिक्षक, खालापूर वकील असोसिएशन, खोपोली पोलिस ठाणे, खोपोली नगर परिषद कर्मचारी संघ, खोपोली व खालापूर पत्रकार मित्र यांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला असून प्रथम क्रमांक केटीएसपी (एचएससी) मंडळ शिक्षक यांनी तर द्वितीय क्रमांक खोपोली पत्रकार संघ यांनी पटकाविला…
खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे यशवंतशेठ साबळे, नामवंत उद्योजक दिपकशेठ कडव, जनता विद्यालय खोपोलीचे अध्यक्ष कैलास गायकवाड, माजी नगरसेवक विशाल गायकवाड, नरेश जाधव, समीर मसुरकर, शिवसेना युवा नेते दिनेश थोरवे, वंचित बहुजन आघाडीचे दीपक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मोहन शिंदे, बाळाशेठ थोरवे, नितीन चौधरी, काँग्रेस युवा नेते सागर जाधव, संदेश धावारे, एनडीटीव्ही (NDTV) मराठीचे पत्रकार महेबुब जमादार, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे संपादक फिरोज पिंजारी, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा साप्ताहीक खालापूर वादळचे मुख्य संपादक खलील सुर्वे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन कोकण प्रदेश अध्यक्ष तथा साप्ताहिक खालापूर वार्ताचे संपादक सुधीर माने, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, जेष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ, शिवसत्ता न्यूजचे संपादक प्रविण कोळआपटे, व्हॉईस ऑफ मीडिया खालापूर तालुका अध्यक्ष दिपक जगताप, पत्रकार राम बोरीले यांसह खोपोली-खालापूरमधील सर्व पत्रकार मित्र तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आयोजक रायगड संकल्प न्यूजचे मुख्य संपादक पत्रकार तय्यब खान व पत्रकार आकाश जाधव यांना शुभेच्या देत कौतुक केले…