आसाराम बापूंच्या दर्शनासाठी भक्त माधव बागेत दाखल…आयुर्वेदिक उपचारासाठी आसाराम बापू माधव बागेत…

0
59

शिवसत्ता टाइम्स चौक (अर्जुन कदम) :-

आसाराम बापू यांच्या दर्शनासाठी त्यांचे भाविक माधव बाग येथे मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे पहावयास मिळत आहे… सद्या कैदेत असलेले आसाराम बापू खालापूर तालुक्यातील आयुर्वेदिक केंद्र माधव बाग येथे उपचार घेण्यासाठी आले आहेत… राजस्थान पोलीस यांच्या बंदोबस्तात येथे मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, खालापूर पोलीस देखील तैनात आहेत. आयुर्वेद केन्द्र माधव बागेजवळ अनेक भाविक दर्शन मिळेल, यासाठी ताटकळत उभे असतात… तर बाहेर गावावरून आलेले भक्तगण आपल्या गाड्या मुम्बई पुणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे करून दर्शन मिळेल याची वाट पाहत आहेत… तर काही भाविक गाड्यांच्या शेजारी थकून झोपलेले दिसत आहेत…. सुरक्षेच्या कारणास्तव माधव बागेच्या बाहेर आसाराम बापू येऊन भक्तांना दर्शन देतील, अशी शक्यता अजिबात नाही…. येथील दोन्ही बाजूचे रस्ते वळणदार असून धोकादायक आहे, याची भीती वाटत आहे…. त्यामुळे स्थानिक पोलिसांवर ताण येत असेल असे वाटते…