मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत…हौशी मुंबईकरांनी मित्रमंडळी, नातेवाईकांच्या सोबतीने ‘थर्टी फस्ट निमित्त पार्टीचे बेत आखले आहेत. यासाठी नामांकित हॉटेल्स, रेस्तराँचे ‘अॅडव्हान्स बुकिंग’ ही केले आहे, तर बहुसंख्य मुंबईकर नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुटुंबासोबत चौपाटी गाठणार आहेत. संपूर्ण शहर ‘थर्टी फस्ट’च्या हाऊसफुल्ल उत्साहाने भारलेले राहणार असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालिका आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
मुंबईकर पार्टीसाठी घराबाहेर पडणार असल्याने त्यांच्या सेवेसाठी हॉटेल्स, रेस्तराँ सज्ज आहेत. दारूची दुकाने आज मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत तर बार व पबमध्ये पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्रीला मुभा आहे.जल्लोषानंतर देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्याची प्रथा बनली आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये उद्या मध्यरात्रीनंतर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील प्रमुख मंदिर प्रशासनांनी दर्शन रांगेची चोख व्यवस्था केली आहे.. पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी गेट वे ऑफ इंडिया येथे जाऊन सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेतला…चौपाटीवर कुटुंबासोबत आनंद लुटताना मुले समुद्राच्या पाण्यात जाणार नाहीत, याची काळजी घ्या.मुंबईतील वाढते प्रदूषण लक्षात घेता जल्लोष करताना मर्यादित व कमी प्रदूषणकारी फटाके फोडा.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्टच्या रात्री गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बस मार्गावर रात्री एकूण २५ जादा विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहेत