महाड वनविभागाकडून कात सदृश्य पावडर जप्त… जवळपास दीड कोटींचा माल जप्त केल्याची माहिती…

0
48

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

गेल्या काही दिवसापासून जंगली वनस्पती पासून तयार करण्यात आलेले कात सदृश्य पदार्थ व पावडरची तस्करी होत असल्याची माहिती महाड वन विभागाला मिळाली असताना सुद्धा वन विभागाकडून वाहनांची तपासणी केली जात नव्हती अशी कुजबूज महाड तालुक्यात सुरू असताना महाड एमआयडीसीचे वाहतूक पोलीस तेजस कदम आणि नारायण तिडके यांनी रात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील नडगाव हद्दीत वाहनांची तपासणी करीत असताना टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एल पी टी २५१५, आणि आर जे ०६ जी बी ३७८६ या दोन ट्रकची तपासणी केली… ट्रकमध्ये संशयास्पद ड्रम आढळून आल्याने घटनास्थळी महाड वनक्षेत्र पाल राकेश साहू दाखल झाले असताना खैर कातीचे अर्क २४० ड्रम १५०३६ कि ग्रम किंमतीचा जवळ्पास १,५०,८१११ रूपयांचा माल आढळून आल्याने दोन ट्रक आणि चार चालक मालक आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनधिकृत तस्करी करणाऱ्या टाटा कंपनीचा ट्रक ही जप्त करण्यात आला आहे…महत्त्वाचे म्हणजे जे महाड वन खात्याला जमले नाही ते महाड एमआयडीसीचे वाहतूक पोलीस तेजस कदम आणि नारायण तिडके या दोघांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली न जाता कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल महाड तालुक्यात अभिनंदन होत आहे…