महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
“घर घर हर घर संविधान” ही मोहीम सध्या महाराष्ट्रात राबवली जात असून, २६ नोव्हेंबर संविधान दिन या दिवशी विवीध उपक्रम राबविण्या विषयी शासनाच्या परिपत्रकानुसार आदरणीय नुरखां पठाण सर व त्यांची टीम गेली तीन वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात संविधान गुण गौरव परिक्षेचे आयोजन करीत असून, त्याचाच एक भाग मंडणगड तालुक्यात ही हा उपक्रम अनेक शाळांमध्ये राबवला गेला..
यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीच्या कामामुळे बरेच कर्मचारी नोव्हेंबर महीन्यात व्यस्त असल्याने हा उपक्रम डिसेंबर महीन्यात राबवला गेला असून मंडणगडमध्ये सामाजीक कार्यकर्ते सुनील जाधव व सेवानिवृत्त शिक्षक नितीन जाधव गुरुजी यांनी संविधान अंतर्गत प्रचार व प्रसार या हेतूने अनेक शाळेतील शिक्षकांची भेट घेऊन त्यांना महत्व पटवून देऊन हा उपक्रम राबविण्यास ऊपकृत केले… म्हणून म्हाप्रळ, देव्हारे, कुंबळे, माहू मंडणगड येथील शाळा व हायस्कूल, बुद्ध विहार माहू, बिएसएनएल पनवेल कार्यालय येथे या संविधान गुण गौरव परिक्षा हा उपक्रम पार पडला… यासाठी देव्हारे येथील कापसे सर, संदे सर, पाटील सर, कुंबळे येथील मोरे मॅडम, म्हाप्रळ येथील सचिन शिर्के सर, माहू येथील संसारे सर गोविलकर मॅडम, मंडणगड येथील कासारे सर, खताते सर यांनी मोलाचे सहकार्य केले…