महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
नवीन वर्षाच्या सुरुवातीला महाड शहरात तरुणी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे…. अपर्णा सुभाष भोसले वय वर्ष ३८ ही महिला घरातून निघून गेल्याने ती बेपत्ता असल्याचे समोर आले आहे… महिला घरात न दिसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे…ती घरात नसल्याने कुटुंबीयांनी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे…तक्रारीनंतर पोलीस तिचा शोध घेत असतात… याबाबत सविस्तर माहिती अशी की नववर्षाच्या सुरुवातीलाच सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपर्णा सुभाष भोसले राहणार सरकारी वसाहत ग्रामीण रुग्णालय महाड येथील विवाहित महिला कोणालाही न सांगता घरातून निघून गेली आहे…याबाबत सदरच्या महिलेबाबत कोणालाही काही आढळल्यास त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्याची संपर्क साधावा हे आवाहन महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार लोळे यांनी केले आहे…