वाढत्या चोऱ्या थांबवण्यासाठी महाड पोलीस ॲक्शन मोडवर… अज्ञात चोरट्यांपासून सावध रहा…सतर्क रहा 

0
55

 महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

महाड शहरात मागील वर्षभरात अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आलेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे… नवेनगर भागातील ग्रीनपार्क या गृहनिर्माण सोसायटीच्या ए व डी इमारतीमध्ये बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती… या संदर्भात महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित सोसायटीमार्फत तक्रार दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली होती… महाड शहराच्या विविध भागांमध्ये या अज्ञातांकडून करण्यात आलेल्या घरफोडीच्या मोठ्या घटना पाहता महाड पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पुन्हा एकदा समोर उभे राहिले आहे…याच पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस सज्ज झाले आहेत… महाड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्रीच्या वेळेस चोरी व घरफोडी होऊ नये याकरिता शहरामधील रहिवासी सोसायट्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी महाड शहर पोलीस ठाणेतील अंमलदार नागरिकांना भेटून मार्गदर्शन करत आहेत.दिवसा व रात्रीस कोणताही संशयास्पद इसम दिसून आल्यास तात्काळ गस्तीवरील पोलीस व पोलीस ठाण्यास माहिती कळविण्यात यावी अशा सूचना नागरिकांना देण्यात येत आहेत.दररोज रात्रीच्या वेळेस एकूण 8 अंमलदार व 1 अधिकारी चोऱ्या/घरफोड्या प्रतिबंधक गस्त करिता नेमण्यात आले आहेत…सदरची गस्त प्रभावीपणे होण्यासाठी आम्ही स्वतः प्रभावी पर्यवेक्षण करीत आहोत…असे आवाहन महाड शहर पोलिसांनी केले आहे…