कामोठे शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
नवी मुंबईच्या कामोठे येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा अखेर झाला आहे. कामोठ्यातील दुहेरी हत्याकांड हे समलैंगिक संबंधास आग्रह केल्याने हत्या झाल्याचे उघड झाले आहे. नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड घडले होते. या हत्याकांडाने संपूर्ण कामोठे शहर हादरले होते…मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड घडले होते. कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीम सोसायटीच्या प्लॅट क्रमांक १०४ मध्ये ७० वर्षीय गीता जग्गा आणि त्यांचा ४५ वर्षीय मुलगा भूषण जग्गी यांचा मृतदेह आढळला होता. यावेळी जितेंद्रच्या अंगावर मारल्याचे व्रण आढळले होते. त्यानंतर कामोठे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास सुरु केला होता.या प्रकरणात पोलिसांनी संशयित संज्योत दोडके आणि शुभम नारायणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मृत जितेंद्र जम्मी आणि दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत होते. ३१ डिसेंबरच्या रात्री जितेंद्र याने दोघांना त्याच्या घरी पार्टी करण्यासाठी बोलावलं होतं. या पार्टीमध्ये दारू प्यायल्यानंतर जितेंद्र याने दोन्ही आरोपींकडे समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आग्रह केला. यामुळे शुभम नारायणी याने एक्टेंशन बोर्ड जितेंद्रच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली. तर संज्योत दोडके याने गीता जग्गी यांची गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे..