अलिबागमध्ये गुणकारी पांढरा कांदा लागवड सुरू…अलिबागमधील पांढरा कांद्याला पर्यटकांकडून पसंती…

0
116

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबागमधील कार्ले,खंडाळे परिसरातील शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू केली आहे. २७५ हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक हे मातीचे दांड करीत वाफे पद्धतीने लागवड केली जात आहे…अलिबागमधील पांढरा कांद्याला पर्यटकांकडून पसंती दर्शविली जाते. अलिबागला फिरायला आल्यावर अलिबागचा पांढरा कांदा विकत घेण्यावर पर्यटक अधिक भर देतात. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, वेश्वी, वाडगाव अशा अनेक गावांतील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. दोन- अडीच महिन्यात कांदा तयार झाल्यावर काढणी करून तो सुकविणे, त्याच्या माळी तयार करणे, त्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी पाठविणे ही प्रक्रिया केली जाते. या कांद्याच्या लागवडीमधून लाखो रुपयांची उलाढाल होते…ही कामे करण्यासाठी स्थानिक महिलांच्या हाताला काम मिळते. रोजगाराचे साधन या कालावधीत सुरू होते.यंदा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यास गेल्या आठ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. सुमारे २७५ हेक्टर क्षेत्रामध्ये ही लागवड करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा लागवडीच्या कामाला लागले आहेत. वाफे तयार करणे, त्यामध्ये कांद्या रोपांची लागवड सुरू आहे…