शिवसेनेच्या रायगड जिल्हाप्रमुख पदी नंदू शिर्के यांची निवड…

0
59

मसळा शिवसात टाइम्स (गणेश म्हाप्रळकर):-

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड दक्षिण जिल्हा प्रमुख पदी उपजिल्हाप्रमुख राहिलेले नंदू शिर्के यांची निवड झाली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले आणि नवघणे यांनी तुतारी हातात घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर. पक्षांन त्यांच्यावर पक्षांतर्गत गटबाजी केल्यामुळे कारवाई केली होती. त्यानंतर जिल्हाप्रमुख पदाची जागा रिक्त असल्यामुळे अखेर नंदू शिर्के यांची या पदावर वर्णी लागली आहे