पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विधानसभेत आवाज उठविणार:आ.थोरवे…संतोष पेरणेंनी केली पत्रकारांच्या सुरक्षेची मागणी…

0
60

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करण्यासाठी वेळ प्रसंगी विधानसभेत आवाज उठविणार असून, पत्रकारांनी आरसा दाखवतो, त्याप्रमाणे काम करावे जेणे करून समाजातील चित्र लोकप्रतिनिधी यांना दिसेल, असे प्रतिपादन आमदार महेन्द्र थोरवे यांनी केले…
बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत… त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते… जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दर्पण आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आला होता… इंग्रज  सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्यात यासाठी दर्पण मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात होता… महाराष्ट्र राज्य सरकारने ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले….              आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून कर्जत खालापूरचे आमदार महेन्द्र थोरवे यांनी पत्रकारांचा सन्मान केला त्यावेळी आमदार महेन्द्र थोरवे बोलत होते… ते पुढे म्हणाले पु.ल.देशपांडे यांनी म्हटल्या प्रमाणे पत्रकारांनी मांजरा सारखे काम केल्यास समाजात घडणाऱ्या अनेक घडामोडी आम्हास त्वरित कळतील, त्यावर उपाय योजना देखील करता येईल… ज्येष्ठ पत्रकार संतोष पेरणे यांनी पत्रकार यांच्या सुरक्षा, निवास व्यवस्था आणि विमा पॉलिसी याची मागणी केली…. तर पत्रकार साबीर शेख यांनी ही समाजाच्या आणि पत्रकारांच्या समस्या मांडल्या… यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे, खालापूर तालुका अध्यक्ष राहुल जाधव यांनी आमदार महेन्द्र थोरवे यांचा सत्कार केला… यावेळी खालापूर कर्जत तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते..