पेण शिवसत्ता टाइम्स (किरण बांधणकर) :-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परीषद रायगडच्या वतीने जिल्हयातील उल्लेखनीय कामगिरी करणारे 15 शिक्षक, 16 शिक्षिका आणि 14 शाळांचा सन्मान करण्यात आला… तसेच परीषदेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले… शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर आणि परीषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पेण येथील रविराज फार्म इथे पार पडला…
यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार संजय केळकर यांनी दिले… आजच्या इंटरनेटच्या युगात पालक त्यांच्या कामात गुंतलेले आहेत, त्यामुळे पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचे काम वाढले आहे, असे प्रतिपादन आ.संजय केळकर यांनी यावेळी केले… रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नीलिमा पाटील, भाजप युवा नेते वैकुंठ पाटील यांनी ही शिक्षकांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या…. संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय गायकवाड यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली… यावेळी जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते…