पालकांनी पाल्यांसोबत काढली अनोखी ‘शाळा सहल’… “लिटील केजी स्कूल” माणगावचा उपक्रम 

0
44

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

सहलीच्या हंगामात शाळा शिक्षण संस्थातर्फे सहलीचे आयोजन करण्याची प्रथा सर्व दूर परिचित आहे…मात्र माणगाव शहरातील एका नामांकित शाळा “लिटील केजी स्कूल” येथे सहल संदर्भात एक आगळाच आणि अनोखा सहल काढण्याचा उपक्रम चक्क पालकांनीच हाती घेतल्याने तसेच शाळेची मदत आणि मंजुरी मिळवून सहल काढल्याने मोठा चर्चेचा विषय ठरला आहे… गेली अनेक वर्षे माणगाव शहरात इंग्रजी माध्यमाची शाळा अर्थातच “लिटील केजी स्कूल” या नावाची शाळा चालू आहे… सदर शाळेत लहान मुलं शिकत असतात आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच इतर अनेक स्तुत्य उपक्रमही राबविण्यात येत असतात… मात्र सहल कधीही काढण्यात आली नव्हती… त्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये महिन्यात पार पडलेल्या पालक सभेत पालकांनी शाळेला (मुख्याध्यापक) विनंती केली की, जर शाळा मुलांची ट्रिप काढण्यास असमर्थ असेल, तर शाळेने आमचीच ट्रिप म्हणजेच “पालक – शाळा सहल” काढा अशी अनोखी शक्कल लढवून आग्रह धरला… त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक गोंधळून गेले आणि त्यानंतर पालक-शाळा सहल काढण्याचा निर्णय घेतला… “पालक – शाळा पिकनिक” ची चर्चा, तारीख तसेच बहुतेक पालक हे कामावर जात असल्याने सुट्टीचा दिवस अर्थातच रविवारचा दिवस सहलीसाठी निश्चित होऊन अखेर दि.05 जानेवारी 2025 रोजी तळा तालुक्यातील कुडे लेणी, मांदाड शहरातील “लक्ष्मी नारायण मंदिर” मुरुड तळा जोडणारा सुंदर निसर्गमय ब्रिज तसेच येथील समुद्रातील खारे पाणी आणि  नदीतील गोड पाण्याच्या  संगम होणाऱ्या ठिकाणी आणि तळा शहरातील “इस्राईल प्राथना मंदिर जसे सिनेगोग” येथे  भेट देवून पालकांनी त्यांच्या मुलांना सोबत घेऊन आनंद लुटला…

या स्तुत्य उपक्रमा बद्दल बोलताना  ‘पालक शिक्षक’ कमिटीचे उपाध्यक्ष शाळेचे विध्यार्थी श्रावण वैशाली चेतन चव्हाणचे पालक  चेतन चव्हाण यांनी या उपक्रमा संदर्भात बोलताना सांगितले की, आम्ही सर्व पालकांनी पालक शाळा ट्रिप काढली आणि एकच धमाल केली आणि आमची मुलं  तसेच मुखायध्यापक, स्टाफने पिकनिकला साथ देवून यशस्वी केले त्यामुळे एक अविस्मरणीय क्षण  आयुष्यभर लक्षात राहील, असे ते म्हणाले… यावेळी पालक सचिव सौं.मसिरा तबिस परकारसह अनेक पालक उपस्थित होते… या “पालक – शाळा ” स्तुत्य उपक्रमाबद्दल खुद्द पालकांनीच यशस्वी उपक्रमाची माहिती सोशलमीडियावर वायरल केल्यामुळे पालकवर्गात कौतुक होत आहे… दरम्यान तळा शहरातील नामांकित हॉस्पिटल”  कुरुक्कर हॉस्पिटल ” चे डॉ. कुरुक्कर यांनी विश्रांतीसाठी आपल्या प्रांगनात जागा दिली व आलेल्या पालक, विध्यार्थी तसेच शाळा स्टाफ यांच्या चहा पाण्याची सोय करुन दिली…  सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी खुद्द पालकानीच सर्व तयारी केल्याचेही पाहायला मिळाले…  दरम्यान दुपारी भोजन झाल्यावर पालकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स खेळण्यात आले… ” How was the Picnic ? Very Fine. ” च्या घोषणा देत सांगता केली… यावेळी या स्पर्धांमध्ये विजेत्यांना शाळेच्या स्नेह संमेलनात बक्षीसे दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले…