खांबच्या सरपंचपदी सुरेखा पारठे यांची बिनविरोध निवड…जनतेला न्याय देण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करणार…

0
50

रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):- 

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचाय खांब येथे आज बहुमताने सौभाग्यवती सुरेखा जितेश पारठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.गेले कित्येक वर्ष ह्या ग्रामपंचायतीवर खासदार सुनील तटकरे,मंत्री तथा आमदार आदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा कायम आहे आणि तो तसाच कायम राहील असा विश्वास तेथील ग्रामस्थानी व्यक्त केला त्याच प्रमाणे नवनिर्वाचित सरपंच सौ सुरेखा जितेश पठारे यांच्याशी बोलतांना ,मी जनतेचे प्रश्न सोडवून त्याना योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न करेन असा विश्वास व्यक्त करा ह्या प्रसंगी उपसरपंच सरपंच सौ सुरेखा जितेश पारठे,उपसरपंच श्री योगेश यशवंत धामणसे जेष्ट रामचंद्र चितळकर ,प्रकाश थिटे,महेंद्र पोटफोडे,नरेंद्र जाधव, मनोज शिर्के, नारायण धनवी त्याच प्रमाणे श्री नवनाथ जोगीबाबा [ राजेशिर्के ],मंगेश पोटफोडे,राकेश कापसे ,सागर मोरे ,अजय पारठे,जनार्दन महाबले ,सुधीर बारसकर ,मंदार पारठे ,दत्ता वातेरे,चंद्रकांत जाधव,रंजना टवले,कांचन मोहीते ,मानसी चितलकर,सुचिता परभलकर आदी उपस्थित होते…