रोहा पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…कार्यक्रमांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी लावली हजेरी…

0
53

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-   

रोहा तालुक्यातील रोहा पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या अध्यक्षांनी रोहा कुंडलिका नदीकिनारी विद्युत रोषणाईच्या सानिध्यात पंचवीस वर्षाची परंपरा राखत सांस्कृतिक कार्यक्रम मोठा उत्साहात पार पडला… या शाळेत  छत्रपती शिवाजी महाराज व गणपतीच्या पूजनाने या समारंभाची सुरुवात करुन शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य, नाटक, वादन आणि गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.शालेय अभ्यास आणि मार्क यांना महत्त्व आहेच. वर्षभर त्यावरच भर दिला जातो. पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा काळ लक्षात घेता त्यांच्यातील विविध कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने विविध उपक्रम शाळेत राबवले जातात.या स्नेहसंमेलनात भारतीय संस्कृतीला अनुसरून पोवाडा, भजन, एकपात्री प्रयोग, भारुड, नाटिका, जुन्या नवीन हिंदी गाण्यांवर आधारित रेकॉर्ड डान्स, रामायणावर आधारित गीत, राजा शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास यावर विद्यार्थ्यांनी गीते सादर केली.गेली 25 वर्ष शाळेची परपरा आहे अनेक जन या शाळेत शिकून मोठे झाले काही dr झाले तर इंजिनीयर व सीए देखील झाले.. गेले 5 वर्ष 10 वीमध्ये रिझल्ट हे 100 टके आहे…हा या शाळेचा इतिहास आहे…हाच वारसा गेल्या अनेक वर्षापासून जपत यावर्षी देखील उत्तम रित्या नियोजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
रोहा पब्लिक स्कूलचे गॅदरिंग उद्घाटक माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे रोहा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष समीर सकपाळ ,उपाध्यक्ष सौ समिधा सकपाळ, खजिनदार  हसमुख जैन ,सेक्रेटरी मकरंद बारटक्के ,ट्रस्टी सई सकपाळ ,शिवराज सकपाळ प्रमुख उपस्थिती तर माजी नगरसेवक अहमद शेठ दर्जी ,महेशजी कोलटकर , मयूरजी दिवेकर शिल्पाताई धोत्रे , मनीषाताई अंबरे ,योगाचार्य विभा चोरगे ,युवा नेते रवी चाळके ,गीता ताई पडवळ , बांधकाम व्यावसायिक राकेश शेठ मोरे ,रामशेठ नाकती ,सतीश भाऊ देशमुख ,शाळेच्या जॉईंट ऍडमिनिस्ट्रेटर सौषा सुरज प्रिन्सिपल डोंगरदिवे तसेच  आजी-माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती,गावातील ज्येष्ठ मंडळी ग्रामस्थ, महिला, पालक, विद्यार्थी, पत्रकार मोठ्यासंख्येने उपस्थित होते…