खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत साप्ताहीक खालापूर वार्ता व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी रोजी पत्रकारांचा सन्मान,वकृत्व स्पर्धा आणि साप्ताहिक खालापूर वार्ताच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा खालापूर येथील आदिवासी भवन येथे आयोजित करण्यात आला होता…या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोपोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ.सुनील गोटीराम पाटील होते…सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, आद्य संप्रतिनिधी पादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मराठी पत्रकार दिन का साजरा केला जातो? पत्रकार कसा असावा?आचार्य बाळशास्त्री जांभेकर कौन होते? या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…यात खालापूर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपले परखड विचार मांडले…या विद्यार्थ्यांमधून चार क्रमांक काढण्यात आले…प्रथम पारितोषिक रु. 1000/- रोख आणि प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रु. 700/- रोख आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक रू. 500/- रोख आणि प्रमाणपत्र, चतुर्थ क्रमांक रू. 300/- रोख आणि प्रमाणपत्र असे बक्षिस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
दरम्यान,यावेळी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनी साप्ताहीक खालापूर वार्ताचे संपादक सुधीर माने यांची न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा कोकण प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच अक्षराज व सामर्थ्य महाराष्ट्राचे प्रतिनिधी मानसी गणेश कांबळे यांची राष्ट्रीय महिला महासचिव, सुधीर देशमुख यांची खालापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे याप्रसंगी साप्ताहीक खालापूर वार्ताच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रतिमा पूजन खालापूर डीवायएसपी पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले…
यावेळी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, खालापूर पोलिस उपनिरीक्षक (DYSP) सुधीर शिंदे,खालापूर शिवसेना शहर प्रमुख पद्माकर पाटील, गटनेते किशोर पवार, बिरसा ब्रिगेडचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अनंत वाघमारे,महिला अध्यक्ष हिराबाई पवार, आदिवासी संघटनेचे नेते दिलीप डाके, स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर, कोकणे सर कुंभार समाजाचे अध्यक्ष कैलास वाडेकर, जिल्हा मुद्रांक संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम वाणी, शिवसेना खालापूर शहर निरीक्षक निखिल मिसाळ, पोलीस पाटील मनोज पारठे, ह भ प कानिफनाथ पार्ठे, सुरेश दिघे, सेवानिवृत्त हेमचंद्र पारंगे, पत्रकार संजय पाटील, सुभाष वंशपायन,पत्रकार रवींद्र जाधव, जतीन मोरे वकृत्व स्पर्धेचे , पंच व निरीक्षक म्हणून काम सौ मंडावळे मॅडम, व पवार मॅडम यांनी पाहिले 40 ते 50 विद्यार्थी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.