मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-
एक दिवसीय क्रिकेटच्या एकूण तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज शुक्रवारी दि. १० जानेवारी २०२५ रोजी स.१०.३० वाजता टॉस करून ११.०० वाजता सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम, राजकोट येथे आयर्लंड विरूद्ध खेळून यावर्षीच्या आपल्या नवीन वर्षाच्या क्रिकेट सामन्यांचा आरंभ करणार आहे.आयर्लंड विरूद्धची एकदिवसीय क्रिकेटची ही मालिका तशी रंगतदार होईल असा कयास आहे कारण २०२४ च्या हंगामाचा शेवट किमी इंडीयाच्या महिला क्रिकेट ब्रिगेडने अप्रतिम केला होता.किम वूमेंस आयर्लंड विरूद्ध वूमेंस इंडियाचा हा एकदिवसीय क्रिकेट सामना दूरदर्शन वरून स्पोर्ट्स १८ या नेटवर्क चॅनलवर पाहता येईल तर मोबाईलवर जियो सिनेमावरून पाहता येणार आहे… भारतीय संघ स्मृती मानधना (कर्णधार),दीप्ती शर्मा (उप-कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जमिमाह रॉड्रिग्ज, उमा नेत्री (विकेट किपर), रिचा घोष (विकेट किपर), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवेर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे.नियमित कर्णधार हरमनप्रीत कौल सध्या अनुपस्थित असल्याने स्मृती मानधनात कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे…