ओव्हरहेड तुटल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर गोंधळ…

0
56

मुंबई शिवसत्ता टाइम्स ( देवेंद्र मोरे ) :- 

पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान आज ओव्हरहेड तुटल्याने मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे शेड्यूलच कोलमडले.सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्यामुळे मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक खोळंबले. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्याची मोठी कुचंबणा झाली. रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे अशी माहिती आहे.