किन्नर माँ सामाजिक संस्थेच्या वतीने 11 वी गुलाबी रॅली…मुंबईतील ग्रॅण्टरोड ऑगस्ट क्रांती मैदानात रॅलीचे आयोजन…

0
78

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-                  

मुंबईतील ग्रॅण्ट रोड येथे असणाऱ्या ऑगस्ट क्रांती मैदानात किन्नर माँ सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सलमा खान आणि सामाजिक कार्यकर्त्या तृतीयपंथी प्रिया ताई पाटील यांच्या नेतृत्वात 11 व्या गुलाबी रॅलीचे आयोजन सोमवार दिनांक 13-1-2025  रोजी करण्यात आले… तृतीयपंथी समाज आणि एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए. या समुदयांच्या न्यायिक हक्कासाठी या गुलाबी रॅलीचे मुख्य आयोजन करण्यात आले… तर किन्नर माँ सामाजिक संस्थेच्या  मुख्य संचालिका सलमा खान यांनी तृतीयपंथीयांना त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी म्हणून आपलं आयुष्य तृतीय पंथीयांच्या सोबत घालवलं… किन्नर माँ ट्रस्टच्या प्रिया पाटील ह्यांनी सुद्धा मोठा संघर्ष केला असून, त्या आपल्या तृतीयपंथी समुदायासाठी झटत आहेत… सलमा खान यांचा किन्नर माँ ट्रस्ट हा मुंबई विक्रोळी येथे असून, त्या जे वंचित आहेत, शोषित आहेत त्यांना आधार देतात… कायद्याने न्यायालयीन लढाई  त्या जिंकत आहेत… अशातच कोरोना काळात तृतीय पंथी समुदायकडे दुर्लक्ष करण्यात आले होते… या तृतीयपंथी समुदायाकडे जनतेचा बघण्याचा कौल वेगळाच असतो… त्यांच्यावर शारीरिक अत्याचार सहित मानसिक आर्थिक अत्याचार सुद्धा होतो… अनेकवेळा त्या शारीरिक शोषणाच्या शिकार झालेल्या असतात… त्यातूनच हा तृतीय पंथी समुदाय तयार होतो… आपण त्यांना विविध नावांनी आवाज देतो, हाका मारतो… त्यांची स्त्री पुरुष आणि आता तिसऱ्या लिंगात ओळख निर्माण होते, ती तृतीयपंथी समुदायची… कोरोना काळात सलमा खान यांनी महाराष्ट्रामधील जेवढे तृतीयपंथी समुदाय राहतो त्यांना आर्थिक मदत पोचवण्याचे मोठे कार्य केले… संपूर्ण शिधा सहित अन्नधान्य, कपडे, औषधे पुरवण्याचे मोठे कार्य केले… यांची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली…
आम्हाला स्वतःच्या हक्कासाठी आजही रस्त्यावर उतरावं लागतं हे सरकारला का दिसत नाही, आम्ही सुद्धा एकाच आईबाबा कडून जन्माला आलोय, सामान्य नागरिकच आहोत, तुम्हीच आम्हाला देव बनवलं, सगळ्या शुभ कार्यात आम्हाला बोलवतात आणि आमच्या हक्कासाठी कोणीही आवाज काढत नाही, ब्र शब्द सुद्धा बोलत नाहीत, आम्ही सुद्धा शिक्षक, अभिनय क्षेत्रात, वकिली, डॉक्टर, पोलीस, मॉडेल, गायक, नर्तक, अभियंता, अभियांत्रिकी, यासारख्या क्षेत्रात सहभागी होत आहोत… आमचं कार्य करत आहोत, तरीही कोणताही सरकार आमचा प्रश्न मार्गी लावत नाही… अश्या भावनिक शब्दात  किन्नर माँ ट्रस्टच्या संचालिका सलाम खान बोलत होत्या… तसेंच भाकर फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक दिपक सोनावणे सुद्धा या ट्रान्सजेंडर समुदयासाठी लढत आहेत… तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी, त्यांच्या प्रत्येक सुखा दुःखात सहभागी होऊन त्यांचं दुःख कमी करण्याचं मोठ कार्य करत आहेत…
ऑगस्ट क्रांती मैदानापासून ऑपेरा हाऊस ते पुन्हा ऑगस्ट क्रांती मैदान असे या रॅलीचे स्वरूप होते… देशभरात असलेले तृतीयपंथी समाज आणि एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए. समुदाय हा गुलाबी साडी, गुलाबी पारंपरिक पोशाख आणि दागिने परिधान करत गुलाबी रॅलीत सहभागी झाले होते… तर एवढेच नाही तर तृतीयपंथी समाजासोबतच महिला आणि पुरुष बांधव सुद्धा सहभागी होताना दिसून आले, अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, पदाधिकारी, डॉक्टर, वकील, शिक्षक यांचा विशेष सहभाग दिसून आला…
किन्नर माँ सामाजिक संस्थेच्या   संस्थापक अध्यक्षा  तृतीयपंथी डॉ.सलमा खान, सामाजिक कार्यकर्त्यां तृतीयपंथी प्रिया पाटील ताई, हमसफर सामाजिक संस्थेच्या  कार्यकर्त्या तृतीयपंथी निलोफर शेख, भाकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, ऍडव्होकेट, डॉ. दिपक भाऊ सोनावणे, सामाजिक कार्यकर्त्या सरला व्होरा, तृतीयपंथी नृत्य दिग्दर्शिका साक्षी मुंबईकर उपस्थित होते…