दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
मकरसंक्रांतीला दि.१४ जानेवारी २०२५ रोजी भारतीय सेना दलातील वीरगती प्राप्त कै.सुनिल गो.पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दापोली येथील गव्हे या त्यांच्या गांधी कै.सुनिल गो.पवार स्मृती फाऊन्डेशनच्यावतीने आयोजित करण्यात आला होता…पतंग उडवणे ही अनोखी स्पर्धा सलग तिसऱ्यांदा गव्हे-पवारवाडी येथे उत्साहात पार पडली… शाळेतील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या अनोख्या स्पर्धेचे सालाबादप्रमाणे मुक्त आनंद लुटला…श्री सुनंदा भावे यांचे मंत्रमुग्ध करणारे समालोचन जमलेल्या वयोवृद्धांच्या स्मृतीना, त्यांच्या बालपणीच्या आठवणींना हळुवार घेऊन गेला…यावेळी दापोली तालुक्यातील तब्बल ४८ हौशी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता… या स्पर्धेत कु. अर्णव गणेश गुरव याने बाजी मारली… कुमार अर्णव गणेश गुरव याने पहिला क्रमांक पटकावला, तर कुमार आयुष संजय मिसाळ याने दुसरा तर तिसरा क्रमांक कुमार कुणाल सचिन जोशी याने मिळवला… तर अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक श्री. प्रतिक दिपक पुणेकर व बाल कलाकार कुमार स्वराज सुदीप लिंगावळे यांनी काबिज केला… श्री.प्रतिक दिपक पुणेकर हा उत्कृष्ट पतंग शैलीचा मानकरी ठरला… या स्पर्धेच्या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत गव्हे-निगडेचे सरपंच मा.श्री.लक्ष्मणजी गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री. महेशजी हुंडेकरी तसेच मा.श्री.विजयजी कोलंबेकर व जळगाव शाळेचे मुख्याध्यापक व जळगाव ग्रामस्थ मा.श्री.दीपकजी बेनैरे सर तसेच कट्टर सैनिकप्रेमी मा.श्री.सुनंदा भावे व या. श्री. गजानन लिंगावळेसह सर्व स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले…