पोलीसांचा खरा कणा…पडद्याआडचे रक्षक… नवी मुंबई पोलीस उपायुक्ता रश्मि नांदेडकरांचे वक्तव्य…

0
58

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

२००९ मधील बॅचच्या रश्मि नांदेडकर यांनी विदर्भ, नाशिक, भंडारा,नागपूर येथे आपल्या कामातून स्वतंत्र छाप उमटवली यानंतर सध्या नवी मुंबईत कार्यरत आहेत… बहुतांश अधिकाऱ्यांना नकोशी वाटणारी विशेष शाखेची जबाबदारी नांदेडकर यांनी मात्र आनंदाने स्वीकारली… शहरात कोणत्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची सभा, प्रवास होणार असल्यास त्यांच्या सुरक्षेचा पूर्णपणे गोपनीय आढावा याच विशेष शाखेकडून घेतला जातो… पडद्याआड राहणारे पोलीस थोड्याफार नागरिकांना माहिती असतील… कुठल्याही चर्चेत न येता, गोपनीय कामकाज करणारी विशेष शाखेची ही यंत्रणा पोलीसांचा मुख्य कणा असतो… नवी मुंबई पोलीसांचा हाच कणा भक्कम राखण्याची जबाबदारी पोलीस उपायुक्त रश्मि नांदेडकर सध्या निभावत आहेत… शहरात कोणताही गुन्हा, दुर्घटना घडली की, घटनास्थळी दिसतात ते पोलीस, संकटकाळी आठवतात ते सुद्धा पोलीस, त्यामुळे पोलीस ठाण्यात नेहमी दिसणारे पोलीस किंवा गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीसच प्रत्येकाच्या तोंडी चर्चेत असतात… मात्र, त्याही पलीकडे एक महत्त्वाचे काम हाताळणारे मात्र नेहमीच पडद्याआड राहणारे पोलीस थोड्याफार नागरिकांनाच ठाऊक असतात अशी बहुमोल मार्मिक प्रतिक्रिया नवनियुक्त नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्ता रश्मि नांदेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली…