चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
अपर प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हिवाळी पाणपक्षांची प्रगणना करण्याकरिता जागतिक संस्थेने ठरविलेल्या निकषानुसार खालापूर तालुका वन विभागाने तालुक्यातील विवीध पाणस्थळावर सर्वेक्षण कार्यक्रम आयोजित केला होता… यावेळी खालापूर तालुक्यातील वन विभागाच्या पाणस्थळावर स्थानिक प्रजाती यांच्या बरोबर विदेशी आणि आंतरराज्य पक्षी निरीक्षण करण्यात आले… ही प्रगणना करण्याकरिता वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत पक्षी मित्र तसेच हेल्थ फाउंडेशन या संस्थेची मदत झाली… खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेपासून सूर्योदय झाल्यानंतर तालुक्यातल्या पाणस्थळावर पक्षी निरीक्षण करून नोंद करण्यात आली…