कोंकणात खेड येथे श्री स्वामी नारायण मंदिराचा शिलान्यास… साधू संतांच्या उपस्थितीत गृहराज्य मंत्र्यांच्या हस्ते सोहळा संपन्न…

0
75

खेड शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

कोंकणातील पहिले स्वामीनारायण मंदिर येथील खेड मध्ये उभे रहात असून त्याचा शिलान्यास गृहराज्यमंत्री ना‌. योगेश कदम यांच्या हस्ते रविवारी थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात जणू काही हिंदूत्वाचा जागर पहायला मिळला…  अनेक भक्तांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती. खेडमध्ये भव्यदिव्य दिमाखदार स्वामीनारायण संस्कार धाम उभारण्यात येत आहे. या शिलान्यास सोहळ्याच्या निमित्ताने विविध साधू संतांच्या उपस्थितीत गेले तिन दिवस अनेक कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी संत कोठारी स्वामी आणि अनेक साधूसंतांची उपस्थिती होती. याप्रसंगी मंत्री योगेश कदम म्हणाले की कोंकणात खेडमध्ये हिंदूत्वाचा जागर होताना अनुभवास आला. याच दरम्यान खेड येथील तरुण भारत या वृत्तपत्र कार्यालया देखील सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे तरुण भारतच्या खेड कार्यालयीन वृंदा कडून जल्लोषात स्वागत केले गेले. मंत्री झाल्यानंतर योगेश कदम यांची स्थानिक कार्यालयास पहिलीच भेट होती. या समयी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना रत्नागिरी आवृत्ती प्रमुख महेंद्र पराडकरसह प्रशासकीय अधिकारी सुनील राऊत, खेड तालुका प्रतिनिधी राजू चव्हाण, दापोली तालुका प्रतिनिधी मनोज पवार, शि. से. जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, जि.प. माजी सदस्य अरुण कदम, शैलेश कदम, किशोर देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.