गोरेगाव येथे मकरसंक्रातीनिमित्त राज्यस्तरीय सामूहिक १०८ सूर्यनमस्कार शिबीर यशस्वी संपन्न!…

0
49

जोगेश्वरी शिवसत्ता टाइम्स (पूनम पाटगावे):- 

रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र योगशिक्षक संघचे संस्थापक अध्यक्ष डॉ मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्हा आणि व्हीनस कल्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामूहिक १०८ सूर्यनमस्कार शिबिरामध्ये १७० हून अधिक योगप्रेमी सहभागी झाले होते. ह्या कार्यक्रमामध्ये गोरेगाव विभागातील आमदार विद्याताई ठाकूर , संपादक योगवार्ता, योग विद्या निकेतनचे श्रीधर पांडूरंग परब , भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर तसेच महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे कोकण विभाग प्रमुख व योगाचार्य विश्वास शिर्के असे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्याचा ह्या दुसऱ्या वर्षीच्या उपक्रमामध्ये योगसाधकांचा भरभरून प्रतिसाद लाभला व सर्व योगसाधकांनी १०८ सूर्यनमस्कार झाल्यानंतर जल्लोषात आनंद साजरा केला.
या सर्व नियोजनात मुंबई जिल्ह्याचे महासचिव  कृष्णकुमार शिंदे, कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, सचिव अमित चिबडे, सुषमा माने, उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई, साक्षी कलगुटकर, प्रियांका ढोले, सोशल मीडिया प्रभारी प्रशांत मकेसर, संघटन सचिव विकास ओव्हाळ, सदस्य  विजयालक्ष्मी शर्मा, श्वेता पिसाळ, रेश्मा धुरी पाटील, अर्निका बांदेलकर, मनुजा चव्हाण, हिरा गणवीर, भारती कवनकर, कांचन राणे, प्रसाद काठे, वर्षा शर्मा, जयदीप कनकिया, हेरंब म्हात्रे, सचिन येवले, अमोल देवघरकर, रक्तदान दाता साई रामपूरकर  यांच्या सर्वांच्या मेहनतीने व उपस्थित साधकांमुळे हे उपक्रम यशस्वी झाल्यामुळे मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.