खालापूर शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
खोपोली येथील रहिवासी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक भारतभूषण शितलताई गायकवाड यांना नुकतीच महात्मा गांधी ग्लोबल युनिव्हर्सिटीकडून स्पोर्ट्स (मार्शल आर्ट) या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी देवून सन्मानित करण्यात आले. ही पदवी संसद भवन, नवी दिल्ली येथे शाब्बास खान, मेरी लुइस्सा आणि गवई सर यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली.
शितलताई गायकवाड यांनी मार्शल आर्ट्स क्षेत्रात एक अद्भूत यश मिळविलेले आहे…त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल खोपोली शहरासह संपूर्ण खालापूर तालुक्याला अभिमान वाटत आहे. या पुरस्काराने खोपोली शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मार्शल आर्ट्स क्षेत्रात त्यांनी मिळवलेले हे यश खेळ आणि शारीरिक तंदुरुस्ती तसेच तरूणी व महिलांसाठी प्रेरणादायी आहे…संसद भवनासारख्या प्रतिष्ठित स्थळी पदवी प्रदान होणे, हे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ आहे. ही डॉक्टरेट पदवी केवळ त्यांची व्यक्तिगत उपलब्धी नसून, संपूर्ण कुटुंब, प्रशिक्षक तसेच त्यांच्या समर्थकांसाठीही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशामुळे मार्शल आर्ट्स आणि महिलांच्या योगदानाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.