पोलादपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल… श्रीकांत भाऊ भिलारे व दत्ता साळुंखे दोन्ही आरोपी फरार…

0
45

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

पोलादपूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे… फिर्यादी ज्ञानेश्वर एकनाथ मोरे राहणार निगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी श्रीकांत भाऊ भिलारे राहणार दिवील तालुका पोलादपूर व आरोपी दत्ता साळुंखे राहणार लोहारमाळ तालुका पोलादपूर या दोघांनी संगणमत करून फिर्यादी यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली… जवळपास 50 हजार रुपयाची खंडणी या दोन आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे केली तसेच मौजे लोहारमाळ येथे फिर्यादी यांची पिकप रोडवर अडवून दोघा आरोपींनी फिर्यादी यास तुम्ही बेकायदेशीर लाकडाचा व्यवसाय करीत आहात असे बोलून शिवीगाळ, दमदाटी व हाताबुक्याने मारहाण केली व फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने पाच हजार रुपये गुगल पेवर देण्यास भाग पाडले… या संपूर्ण घटनेमुळे पोलादपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 308 (2)(3),126(2),115(2),352,352(2)(3),3(5) कलम अन्वये गुन्हा दाखल झाला असून पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत… श्रीकांत भाऊ भिलारे व दत्ता साळुंखे हे दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा लवकरच शोध घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली आहे…