जे.एस.डब्लू कंपनीची 400 केवीएसच्या टॉवर लाईनविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार… मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा…

0
70

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगडच्या वडखळ डोलवी हद्दीतील जे.एस.डब्लू कंपनीची 400 केवीएसच्या शेतजमिनीतून जाणाऱ्या विद्युत टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे…जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत टॉवर लाईनचे काम बंद ठेवावे…अन्यथा या कामाविरोधात उग्र जन आंदोलन छेडून शेतकरी आमरण उपोषणास बसतील असा इशारा दिला आहे…शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला असून भविष्यात हजारो शेतकरी एकजूट व संघटित होऊन व्यापक स्वरूपाचे आंदोलन पुकारण्याच्या भूमिकेत आहेत…शेतकऱ्यांनी बुधवारी निडी भागात टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी धडक देऊन सदरचे काम त्वरित बंद करावे असा इशारा दिला…  यावेळी शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची,जे एस. डब्लू प्रशासनाचा धिक्कार असो,धिक्कार असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला…सद्यस्थितीत जे.एस.डब्लू कंपनीकरीता टॉवर लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे… कानसई ते जे.एस.डब्लू कंपनीपर्यंत शेताच्या मध्यभागातून जे.एस.डब्लू टॉवर लाईन शेत जमिनीमधून जात असल्याने कोलेटी, खार कोलेटी निगडे,आमटेम सह विभागातील शेतकरी वर्गात असंतोषाची भावना उफाळून आली आहे… आपल्या तक्रारी व मागण्यांचे निवेदन शेकडो शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी व मंत्रालय स्थरावर दिलेले आहेत… जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध राहणार असल्याचा आक्रमक इशारा शेतकऱ्यांनी दिलाय…