रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
मोहोपाडा बाजूकडून रिस बाजूकडे जाणाऱ्या एक्टिवा स्कुटीवरील चालक डिव्हायडरवर धडकल्याने एक जण जागीच गतप्राण तर दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.२४ जानेवारी रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या दरम्यान रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली…याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तराडे येथील किशोर चंद्रकांत पाटील वय (२९) हा त्याचा मित्र वेदांत हडप वय (१७) यास तुराडे येथून रिस येथे सोडण्यासाठी एक्टिवा स्कुटी क्रमांक एम.एच.४६ सी.एन.९५५२ वरुन निघाला असताना मोहोपाडा येथील सेबी रोड असणाऱ्या नामदेव मोटिओ किचनच्या समोर असलेल्या डिव्हायडरवर एक्टिवा स्कुटी जोरदार धडकल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात तुराडे येथील किशोर चंद्रकांत माळी हा २९ वर्षीय तरुण मृत झाला… तर त्याचा मित्र रिस येथील अंबे स्मृती बिल्डिंगमध्ये वास्तव्यास असलेला वेदांत हडप वय (१७) जखमी झाला आहे… सदर अपघाताचे वृत्त समजताच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव व त्यांचा पोलीस स्टाफ घटनास्थळी दाखल झाले… सदर घटनेची रसायनी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी हे करीत आहेत…