७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा… मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते ध्वजावंदन…

0
49

 अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
मुख्य कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशन जावळे,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते…

यावेळी झालेल्या शानदार संचलन द्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात  पोलीस दल पुरुष, महिला, गृहरक्षक दल,  वाहतूक विभाग दुचाकीस्वार,  वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक,  दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका, अंमली पदार्थ शोधक, श्वान पथक, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर सविता गर्जे यांनी केले.