पेण तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

0
36

पेण शिवसत्ता टाइम्स किरण बांधणकर

पेण प्रांत कार्यालयाचे ध्वजारोहण प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्या हस्ते झाले…. यावेळी स्थानिक आमदार रविशेठ पाटील, तहसिलदार तानाजी शेजाळ आदि मान्यवर उपस्थित होते… तर पेण नगरपालिकेचे ध्वजारोहण मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते झाले… नगरपालिकेच्या ध्वजारोहणासाठी माजी नगराध्यक्षा, नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते… तर प्रांत कार्यालयातील ध्वजारोहणासाठी पेण तालुक्यातील राजकीय पक्ष्यांचे पुढारी कार्यकर्ते तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते… पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ.म.ना. नेने कन्या विद्यालयाच्या पटांगणावर शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परेड, देशभक्तीपर गीतांचे गायन, नृत्य, लेझीम, आदि  कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करुन जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले… तर ध्वजारोहण, पी. एम. भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले…
महात्मा गांधी स्मारक संस्था व महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद गणपत वनगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर पेण कोनायन्स स्कूलच्या शाळेचा ध्वजारोहण शुभांगी नेने यांच्या हस्ते करण्यात आले… पेण सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचा ध्वजारोहण अध्यक्ष ऍड.पी.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला… तर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सार्वजनिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी पुर्ण पेण शहरात ढोल ताशाच्या गजरात प्रभातफेरी काढली…
पेणच्या इतिहासात प्रथमच प्रांत कार्यालय पेण येथे मानवंदना परेड घेण्यात आली… यामध्ये चार तुकडीने भाग घेतला होता… तर यामध्ये पेण पोलीस ठाणे 21 कर्मचारी दुसऱ्या तुकडीमध्ये आर.एस.पी.चे 16 विद्यार्थी, तिसऱ्या तुकडी मध्ये स्काउड गाईडचे 16 विदयार्थी तर चौथ्या तुकडीमध्ये पेण प्रायव्हेट हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे 16 विदयार्थी असे सहभागी झाले होते… त्यानंतर सौ.म.ना.नेने कन्या विद्यालय पेण संविधानावर आधारित पथनाट्य, भाऊसाहेब नेने महाविदयालयतर्फे स्वच्छता अभियान पथ नाटय, प्रायव्हेट हायस्कूल आणि सौ.म.ना.नेने कन्या विद्यालय आर.एस.पी. सिग्नल प्रकार सार्वजनिक विदयामंदीरकडून ढोल पथक प्रात्याक्षिक आणि आय.डे.केअर या मुलांकडून वंदे मातरम या गीतावर नृत्य सादर करण्यात आले… तर आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ऍग्री स्टॉक योजनेअंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आले… सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी केले…