आता दापोली करांचा एस. टी. बस प्रवास होणार सुखद… मंत्रीपद मिळताच दापोलीचे आमदार ना. योगेश कदम यांचा कामाचा झपाटा…

0
42

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

दापोलीचे आमदार ना. योगेशजी कदम यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागताच मतदारसंघातील जनतेसाठी आता त्यांच्या कामाचा सुपरफास्ट उरक पहायला मिळताना दिसत आहे.गेली वर्षांनुवर्षे राज्य महामंडळाच्या बसने प्रवास करताना स्थानिक प्रवाशांची मोठीच गैरसोय आणि दमछाक होत असे.मंत्री महोदयांच्या प्रयत्नाने राज्य महामंडळाच्या दापोली बस आगारास आता नवीन बसेसचा ताफा लाभला आहे, यामुळे आधीच्या बसेस मधून प्रवास करताना होणाऱ्या त्रासाला आता ब्रेक लागणार आहे. हे वृत्त समजताच या भागातील सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे, आणि आपल्या लाडक्या आमदारांचे कौतुक करण्याचे तोंडसुख घेतले आहे. हीच घोडदौड अशीच अविरत चालू ठेवल्यास “भूतो न भविष्यती” या दापोली विधानसभा मतदारसंघात त्यांचे अढळ स्थान निर्माण होणार यात शंका नाही, अशी सर्वत्र चर्चा आहे.