म्हसळा शिवसत्ता टाइम्स (वैभव कळस) :-
स्वातंत्र्योत्तर भारताचा ७६ वा वर्धापन दिन २६ जानेवारी २०२४ संपूर्ण तालुक्यात आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला…. म्हसळा तालुक्यात शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, कॉलेजमध्ये वर्धापन दिनानिमित्त फार मोठा उत्साह दिसत होता…. ठिकठिकाणी “ध्वजारोहण कार्यक्रम संबंधीत कार्यालयातील मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले… प्रामुख्याने म्हसळा प्राथमिक शाळेत पालक शिक्षक समिती अध्यक्ष शशिकांत शिर्के, न्यु इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्य डी.आर.पाटील, वसंतराव नाईक कॉलेजमध्ये चेअरमन फझल हलदे, सार्वजनिक वाचनालयात अध्यक्ष संजय खांबेटे, म्हसळा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष संजय कर्णिक, म्हसळा पंचायत समितीचे गटविकासअधिकारी माधव जाधव, जिजामाता शिक्षण संस्थेचे माजी सभापती महादेव पाटील, म्हसळा तालुक्यातील शासकीय मुख्य कार्यक्रम कन्या शाळेच्या प्रांगणात तहसीलदार सचिन घारे यांचे हस्ते संपन्न झाला… प्रचंड मोठया प्रमाणात संपन्न झालेल्या या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास तालुका लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, लहान थोर मंडळी सहभागी झाले होते… शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला म्हसळा पोलिस निरीक्षक संदिप कहाले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक एडवले आणि त्यांचे पोलिस पथकाने सलामी दिली… सर्वच कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर व नागरिकांनी भारतीय संविधान आणि देशनिष्ठेची सामूहिक शपथ घेतली… या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचे विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले… या संपूर्ण शासकीय ध्वजरोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले… तालुक्यातील पांगलोली येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद हायस्कूल आणि सुरय्या अली कौचाली जुनिअर कॉलेज, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत येथेही मोठ्या उत्साहात वर्धापन दिन संपन्न झाला… येथे संस्थापक बिलाल कौचाली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले… याप्रसंगी संस्थेचे सचिव सलीम वस्ता, सरपंच, उपसरपंच नवाब कौचाली, उपस्थित होते… शाळेचे शिक्षक एजाज हवा यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभरात विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आले…