उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील ) :-
उरण एसटी डेपो मध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्का जाम केला. शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा बाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. एसटी बसच्या तिकीट दरात १५ टक्के वाढ करून सर्वसामान्यांना फटका देणाऱ्या महायुती सरकारला धक्का देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज २८ जानेवारीला सकाळी राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे.
दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले. उरण एसटी डेपो येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्का जाम केला. शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा बाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. उरणमधील एसटी डेपोजवळ मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी भाडेवाढीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. शिवसैनिक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जर सरकारने भाडेवाढ रद्द केली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, सदर आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर ,उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, दिपक भोईर, सूर्यकांत दणॅ, रुपेश पाटील, एस.के पुरो. चेतन गायकवाड, उपजिल्हाप्रमुख सौ ममता पाटील, मनिषा ठाकूर, अमिता थळी सह असंख्य शिवसैनिक, महिला पदाधिकाऱी उपस्थित होते.