विश्वकर्मा आर्मी महाराष्ट्रच्या वतीने कॅलेंडर उद्घाटन उत्साहात संपन्न… संघटनेच्या भविष्यातील कार्ययोजना, संघटनात्मक बांधणीवर चर्चा…

0
27

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

अखिल भारतीय विश्वकर्मा महासभा अंतर्गत कार्यरत विश्वकर्मा आर्मी महाराष्ट्र आणि विश्वकर्मा सामाजिक सेवा संस्था, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संघटनेच्या कॅलेंडर उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला… या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली…. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून वरसे ग्रामपंचायत सरपंच माननीय श्री.अमित मोहिते, सदस्य श्री. रामा म्हात्रे, गरुड झेप फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. दुर्गेश नाडकर्णी तसेच श्री. रवींद्र देवरे आणि श्री.नरेश बामुगडे यांची विशेष उपस्थिती होती…

सदर कार्यक्रमाचे आयोजन विश्वकर्मा आर्मी महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. राजकुमार केशव विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले… कार्यक्रमात संघटनेच्या भविष्यातील कार्ययोजना, समाजासाठी चालविण्यात येणारे उपक्रम आणि संघटनात्मक बांधणी यावर चर्चा झाली…
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.