वाशी येथे रायगड जिल्हा अंजिक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन… 

0
39

पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदिप मोकल) :-

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने  जयभवानी वाशी, वरसुआई वाशी, वैकुंठ दादा पाटील मित्र मंडळ यांचे विद्यमाने पेण तालुक्यातील वाशी येथे छत्रपती सभांजी महाराज क्रिडांगणावर  दिनांक 7,8, 9फेब्रुवारी रोजी पुरुष व महिला गटाची रायगड जिल्हा अंजिक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आसल्याची माहीती    महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह, स्पर्धा संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली  यावेळी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुर्यकांत ठाकुर, सहकार्यवाह संजय मोकल, सदस्य मिलिंद पाटील, जगदिश पाटील, पंच प्रमुख शरद कदम, डोलवीचे सरपंच परशुराम म्हात्रे,पदमाकर पाटील, निलेश पाटील आदि उपस्थित होते….
या स्पर्धेत रायगड जिल्हयातील पुरुषाचे 190 संघ तर महीलांचे 32  संघ सहभागी होणार आहेत तर ही स्पर्धा तिन दिवस चालणार असुन प्रतिदिन या स्पर्धेसाठी  50 सामनाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत… रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचा थरार छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी – वढाव रोड येथे दिनांक 7, 8 व 9 फेब्रुवारी २०२५ या दरम्यान होणार आहे… या स्पर्धेत १९२ पुरुष संघ व ३२ महिला संघाचा समावेश आहे… प्रतिदीन ५० पंचांची नेमणुक या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे…  रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंतभाई पाटील, कार्यवाह चित्राताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार असल्याची माहिती आस्वाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली…
पेण तालुक्यातील खारेपाटात प्रथमच रायगड जिल्हा अंजिक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आसुन या ठिकाणी ५००० ते १०००० प्रेक्षक क्षमता अपेक्षित धरून गॅलरीसह व्यवस्था करण्यात येणार आहे… व्हीआयपी व इतर वाहनांसाठी ३ गेट असून पार्किंग व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात येणार आहे….
या स्पर्धेदरम्यान राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, लोकसभा खासदार सुनील तटकरे, रविन्द्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, मंत्री आदीतीताई तटकरे, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांतदादा ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार जयंतभाई पाटील, चित्राताई पाटील, चित्राताई वाघ व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती वैकुंठ पाटील यांनी दिली… जिल्हा अंजिक्यपद कबड्डी स्पर्धेत ज्या संघाना सहभाग घेयाचा आहे त्या संघानी  आॅन लाईन अर्ज दाखल केले असले तरी आॅफ  लाईन प्रवेश अर्ज असोसिएशनकडे देणे बंधनकारक आहे असे अवाहन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने केले आहे…
या स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला छत्रपती पुरस्कार विजेते विजय म्हात्रे स्मुती फिरता चषक तर महिला विजेत्या संघाला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार प्रमोद ठाकुर स्मुती फिरता चषक देण्यात येणार आहे….