चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-
लोणावळा येथे असलेल्या संत श्री बाळूमामा मंदिरात आज मौनी अमावस्या निमित्ताने अनेक भाविक भक्तांनी संत बाळूमामांचे दर्शन घेतले…. रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती लोणावळा पांगोळी येथे संत श्री बाळूमामा देवाचे उंच डोंगरावर भव्य मंदिर अनेक वर्षांपासून आहे… या मंदिरात नेहमी गर्दी असते. परंतु अमावस्या भाविकांची प्रचंड गर्दी होते, त्यातच आज मौनी अमावस्या असल्याने राज्यभरातून सकाळ पासून या मंदिरात असंख्य भाविक भक्तांनी संत बाळूमामांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला, संत श्री बाळूमामांचे मुख्य ठिकाण आदमापूर (कोल्हापूर) येथे असल्याने प्रत्येकाला तेथे जाणे शक्य होत नाही त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात या मंदिरात रायगड पुणे, ठाणे, मुंबईसह अनेक भागातून मोठया प्रमाणात भाविक भक्त येत असतात त्यांची चांगल्या प्रकारची सोय संत श्री बाळू मामा देवस्थानच्या वतीने करण्यात येत असल्याचे माहिती देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त बबन खरात यांनी दिली आहे. निसर्गरम्य परिसर असून उंच डोंगरावर मंदिर आणि खाली डोंगर दऱ्यात मोठे धरण आहे,त्यामुळे पर्यटकांची गर्दी देखील मोठी असते…