माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
सायंकाळच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर ढालघर फाट्या जवळ एक एस.टी. बस रस्त्याच्या मधोमध बंद पडून प्रदीर्घ वेळ उभी असल्याचे एका युवकास निखिल वाले निदर्शनास आले. सदर बस जर रात्रभर तशीच उभी राहिल्यास नक्कीच पाठीमागून येणारे वाहन धडकणार व मोठा अपघात होणार हे लक्षात येताच निखिल वाले याने तात्काळ आमच्या प्रतिनिधीस वॉट्सअप द्वारे सदर माहिती देऊन विनंती केली की आपण माणगाव एस.टी. डेपोत याबाबत कळवा की एस.टी. बस जवळ वाहन चालक अथवा वाहक यांपैकी कोणीही नाहीत तरी एसटी बस तेथून काळोख पडण्याआधी तात्काळ हटवण्यात यावी कारण बंद पडलेली एस.टी. बस रात्री अंधारात एखादे अन्य वाहन धडकल्यास अपघातास आमंत्रण ठरू शकते. बंद पडलेल्या एस.टी. बसला मागील टायरच्या मागे मोठा दगड ठेवण्यात आला होता जेणेकरून बस रिव्हर्स जाऊ नये. आमच्या प्रतिनिधीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माणगांव आगर प्रमुख यांना संपर्क साधून झालेला प्रकार सांगितला.रात्री उशिरा मुरुड आगार कर्मचाऱ्यांनी येऊन पुढील कारवाई करून महामार्ग मोकळा केला व संभाव्य धोका टाळला. वेळीच प्रसंगावधान दाखवून निखिल वाले या युवकाचे सर्वांनीच कौतुक केले….