उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोप्रोली ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावा यासाठी सात लॅपटॉपची भेट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. कोप्रोली आदिवासी वाडी वरील कुटुंबासाठी लग्न समारंभासाठी लागणारे सभामंडपाचे साहित्य वाटप करुन महिलांसाठी हळदीकुंकू मेळाव्याचे आयोजन केले होते. कोप्रोली गावातील रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोप्रोली ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्न करत आहे.सध्या या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकीय स्तरावर पाहिला जात आहे.प्रजास्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयातील उरण पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी विनोद मिंडे तसेच माजी सरपंच , उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य यांनी एकदिलाने पुढाकार घेऊन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शाळेळा लॅपटॉप ,आदिवासी वाडीतील लग्न समारंभ, इतर कार्यक्रम साठी सभामंडप साहित्य तसेच महिलासाठी हळदीकुंकू मेळाव्या आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच सौ.अलका सतिष म्हात्रे, माजी सभापती विश्वास म्हात्रे, माजी उपसरपंच योगेश विकास पाटील, ग्रामपंचायत मा सदस्य शेखर ठाकूर,शांता कातकरी,बेबी कातकरी, प्रशांत पाटील, निरंजन पाटील,विकास पाटील,सारिका म्हात्रे,क्रांती पाटील, विपुल म्हात्रे,प्रिती कोळी, रुपाली म्हात्रे, शुभांगी म्हात्रे,ग्राम पंचायत अधिकारी पी.यु.खैरे,निवुत्त ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र म्हात्रे तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, शाळेचे शिक्षक वर्ग, गावातील महिला, आदिवासी बांधव उपस्थित होते.