आयसीसी वूमेंस वनडे क्रिकेट चॅम्पियन्स सेमी फायनल सामन्यांचा उद्या थरार…

0
39

मुंबई  शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे ) :-

आयसीसी वूमेंस वनडे क्रिकेट चॅम्पियन्स स्पर्धेतील सेमी फायनलचे दोन्ही गटातील सामन्यांना उद्या ३१ जानेवारी २०२५ रोजी मलेशियाची राजधानी कौलालंपूर येथील बायुएमास स्टेडियमवर सकाळ पासून सुरुवात होणार आहे आणि दोन्ही गटातील सामने याच मैदानावर खेळवले जाणार आहेत…
पहिला सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात सकाळी ८.०० वाजता तर दुसरा सामना दुपारी १२.०० वाजता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे… ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून, भारतीय संघाने एकही सामना न गमावता सेमी फायनल गाठलेली आहे… गत विजेता भारतीय संघ फूल फॉर्म मध्ये असून पुन्हा एकदा उत्कृष्ट सांघिक खेळाचा प्रताप दाखवत मैदान गाजविण्याच्या जोशातच मैदानात उतरेल.
सेमी फायनल मधील विजयी संघ दि.२ फेब्रुवारी रोजी कौलालंपूर येथील याच स्टेडियमवर फायनल मॅचची ठिणगी पाडणार आहेत… हा सामना दुपारी १२.०० वाजता सुरू होईल…