रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
पेण अर्बन सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तांतडीने तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आणि रोजगार हमी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या समवेत आमदार महेंद्र थोरवे यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसह सहकार भवन, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली… या बैठकीत ठेवीदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली… नामदार बाबासाहेब पाटील यांनी या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन दिले…
तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती तसेच हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला होता… आता स्थिर सरकार आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे आणि नामदार भरत गोगावले यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसह नामदार बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली… ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार विभागाकडून प्रयत्न करण्याची ग्वाही याप्रसंगी राज्याच्या सहकार विभागाकडून ठेवीदारांच्या न्यायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले…. यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांची माहिती घेऊन लवकर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली… सदर बैठकीस सहकार आयुक्त दिपक तावरे, अप्पर निबंधक कोथिंबीर, खोपोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील तसेच संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरीष भिवरे आणि सदस्य अनिल बोभाटे, संतोष चौधरी, रविंद्र दणे, मोहन सुर्वे, प्रदीप शहा उपस्थित होते…