रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
पुढच्या पिढीला जागरूक, आदर्श आणि सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टीने राबविलेला माझी शाळा- सुरक्षित शाळा अंतर्गत स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त असल्याचे कौतुकोदगार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काढले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणारा स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी उपक्रम राज्यस्तरीय उपक्रम होणे काळाची गरज आहे…माझी शाळा- सुरक्षित शाळा हा उपक्रम राज्याचा गृह विभाग व शालेय विभाग यांच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येईल अशी ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली.रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५ अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस यांच्यावतीने माझी शाळा सुरक्षित शाळा अंतर्गत सुरक्षित शाळा व स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा २०२५ चे आयोजन बालगंधर्व रंगभवन, रिलायन्स टाऊनशिप, नागोठणे येथे करण्यात आले होते…यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदींसह मान्यवर उपस्थित होते…