तीव्र पाणी टंचाई त्यात लोडा बिल्डरचा नवा कुलाबा करण्याचा घाट… पाणी पुरवठा आणि डंपिंग ग्राउंड यांचं काय?…

0
67

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

अलिबाग तालुक्यात राज्यसरकारने सात एफ. एस.आय मंजूर केले आहेत…शहरात पाणी टंचाई, डंपिंग ग्राउंड चा प्रश्न गंभीर आहे… अलिबाग तालुक्यात आर सी एफ, उसर व गेलं प्रकल्प आहे… त्यात नव्याने शहापूर येथे उद्योगधंदे येत आहेत… अलिबागेत नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतोय… यातच लोडा या विकासकाने नवीन कुलाबा करण्याचा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केलाआहे… हे राज्य जनतेने जनतेसाठी चालवलेले राज्य आहे, आमदार आणि मंत्र्यांसाठी चालवलेले राज्य नाही… मागील १५ वर्षात तालुक्यात एकही नवे धोरण आलेले नाही… त्यात पाणी टंचाई असताना नवे प्रकल्प राबविणार कसे ? पंडित पाटील यांचा राज्यसरकारला लक्षवेधी सवाल…