पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपीला पेण पोलिसांनी केली अटक… पोलिसांच्या कौशल्यपूर्वक तपासाने ४८ तासात गुन्हा उघड…

0
80

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

पेण शहरातील म्हाडा कॉलनी जवळ असलेल्या शिक्षण महिला समितीचे, इंग्लिश मिडीयम स्कुल, गुरुकुल शाळेमधील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेतील मैदानावर दोन दिवसापूर्वी स्काउट गाईड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते… यावेळी शाळेच्या मैदानावर तात्पुरते सहा टेन्ट्स (तंबू ) उभारण्यात आले होते….
कॅम्पचे सर्व कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास सर्व विद्यार्थी, शिक्षक व स्टाफ गुरुकुल शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये झोपण्यास गेले होते… गुरुकुल शाळेचे वॉचमन यांना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ग्राउंडवर काहीतरी जळत असल्याचे दिसून आल्याने ती माहिती स्टाफ शिक्षकांना देण्यात आली….
शाळेतील मैदानावर असलेल्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञाताने पेट्रोल भरलेल्या बाटल्या टेन्ट्सवर  (तंबू)  टाकल्याने यात लागलेल्या आगीमध्ये सहा तंबूंपैकी एक तंबू पूर्णतः जळून खाक झाला होता… याबाबात पेण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता… या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक समद बेग व गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अंमलदार विशाल झावरे आदी पथक करत असताना पेण पोलीस ठाण्याकडील पथकाने घटनास्थळी असलेल्या सुमारे ५५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, परंतु  आरोपीने गुन्हा करण्याकरीता छुप्या रस्त्याचा वापर केला असल्याने आरोपी हाती लागत नव्हता… गुन्हयातील साक्षीदारांची पडताळणी करुन, गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे अथक प्रयत्न करून कौशल्यपूर्वक तपासाच्या आधारे ४८ तासाच्या आत गुन्हा उघड केला असून, गुन्ह्यातील आरोपी समीर नरदास पाटील रा.वढाव तालुका पेण याला तपासाअंती अटक करण्यात आली आहे…

पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक  अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उप निरीक्षक समद बेग, सहा. उप-निरीक्षक राजेश पाटील, पो. हवालदार सचिन व्हस्कोटी तसेच अजिंक्य म्हात्रे, संतोष जाधव, प्रकाश कोकरे, अमोल म्हात्रे, सुशांत भोईर, गोविंद तलवारे या पथकाकडून तत्परतेने तपास करण्यात आला…