पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
केंद्र सरकारच्या नमो दिव्यांग शक्ति अभियान अंतर्गत सुहित जीवन ट्रस्ट पेणची निवड करण्यात आली आहे… रायगड जिल्ह्यामधून बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी गेली 20 वर्षे यशस्वीपणे कार्य करणाऱ्या सुहित जीवन ट्रस्ट, पेण या एकमेव संस्थेची निवड केंद्र सरकारच्या नमो दिव्यांग शक्ति अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग पुनर्वसन केंद्र म्हणून करण्यात आली आहे….
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश असलेल्या नमो 11 सूत्री कार्यक्रमांपैकी नमो दिव्यांग शक्ति अभियान अंतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक त्या सोयी सुविधा व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे… सुहित जीवन ट्रस्ट पेणच्या निवडीमुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे… संस्थेच्या या यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विश्वस्त आनंद व्यक्त करत आहेत…