सरपंच महेश विरले यांचे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन… मीनाताई महेंद्र थोरवे यांची कार्यक्रमाला उपस्थिती…

0
100

कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):- 

धामोते गावचे सरपंच महेश विरले यांच्यातर्फे डिस्कवरी रिसॉर्टच्या एसी हॉलमध्ये हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पत्नी उपस्थित होत्या… कार्यक्रमाच्या आयोजनात वर्षानुवर्षे परंपरागत चालत आलेल्या हळदी कुंकू समारंभातील महिलांचा उत्साह पाहण्यास मिळाला… या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार 5 फेब्रुवारी रोजी सरपंच महेश विरले यांनी केले होते… ज्यात नेरळ, धामोते व आजूबाजूच्या गावातील विविध महिलांनी सहभाग घेतला होता…

हळदी कुंकू हा कार्यक्रम महिलांना एकत्रित येण्याची आणि एकमेकांशी आनंददायक संवाद साधण्याची एक विशेष संधी असते… या वेळी महिलांना हळद-कुंकू लावून त्यांचं स्वागत करण्यात आले… कार्यक्रमाच्या सुरुवातीला, महिलांना शुभेच्छा देण्यासाठी पारंपारिक गोड पदार्थ तिळगुळ व उपहार देण्यात आला… डॉक्टर शिरसाट यांनी महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सर बाबत दक्षता काय घेण्यात यावी तसेच त्याची लक्षण काय आहेत याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश या कार्यक्रमात काही महिलांनी पारंपारिक नृत्य केले आणि हंसी-खुशीच्या गप्पा केल्या. महिलांच्या सौंदर्याने सजलेल्या या कार्यक्रमात, उपस्थितांना खूप आनंद झाला आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा आनंद अनुभवता आला… हळदी-कुंकू हा कार्यक्रम केवळ एक सामाजिक सोहळा नाही, तर महिलांच्या ऐक्याची आणि परंपरा जपण्याची ग्वाही आहे…  कार्यक्रमाचा समारोप उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानले गेले… अशा कार्यक्रमाने महिलांना सामाजिक सहभाग यासह परंपरा जपण्याची जाणीव होते…

बाराशे महिलांनी हळदीकुंकूसाठी उपस्थिती दर्शवली. हळदी कुंकू कार्यक्रम पार पडण्यासाठी सरपंच महेश सुरेश विरले, मीनाताई महेंद्र थोरवे, डॉक्टर शिरसाट, जोत्स्नाताई महेश विरले, उपसरपंच साक्षी सोमनाथ विरले, माजी उपसरपंच रोशन संजय मस्कर, माजी उपसरपंच अस्मिता राजेश विरले, माजी उपसरपंच नूतन भरत पेरणे, ग्रामपंचायत सदस्य गीता गणेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य सविता बळीराम कोलंबे, सामाजिक कार्यकर्ते पपेश विरले, सोमनाथ विरले गणेश मोरे, मनीष मनोहर थोरवे यांचा विशेषश हातभार लागला…