जिवे मारण्याची धमकी… पोलीस ठाण्यात फिर्याद… बिरवाडी-काळीज येथील घटना…

0
47

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संबंधित गुन्ह्यांना आळा कधी बसणार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे… असाच एक प्रकार महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि. ५ फेब्रुवारी रोजी घडला आहे… घर भाड्याचे पैसे न दिल्यामुळे आरोपीने जीवे ठार मारण्याची व गाडी जाळण्याची तसेच घरातील किमती वस्तू जाळून नुकसान केले आहे… फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून फिर्यादी विश्वनाथ म्हस्के यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे…आरोपी समीर उर्फ सहदेव मस्के याला पोलिसांनी अटक केली असून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 326(G),352, 351(2), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे… महाड एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीची रवानगी अलिबाग कारागृहामध्ये करण्यात आली आहे. संबंधित आरोपीने यापूर्वी देखील गाड्या जाळणे व धमकी देण्याचे प्रकार केल्याचे समजते. महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मुंडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.