झिराड येथे अलिबाग प्रीमियर लिगचा थरार… साई क्रीडा मंडळाचे आयोजन…

0
54

 अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांची संकल्पना आणि झिराड येथील “साई क्रीडा मंडळ” यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग प्रीमियर लीग मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…स्पर्धेचे उद्घघाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शुभाहस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिलीप भोईर, अलिबागचे उप-विभागीय अधिकरी मुकेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते…

झिराड ग्रामपंचायतीच्या भव्य मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा विद्युत प्रकाश झोतात होत असून स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे… राहुल नार्वेकर यांनी या अलिबाग प्रीमियर लीग स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल तोंडभरून कौतुक केले… ग्रामीण भागात अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे, आणि त्यातून स्थानिक  खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर क्रीडाक्षेत्रात प्रवेश करणे सुलभ होईल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला…