व्हॅलेंटाईन डे निमित्त राज्यभरात रोटी डे साजरा एक घास… भुकेलेल्यांसाठी गरजवंतांपर्यंत पोहचणार भाजी भाकरी… 

0
35

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

माणुसकी आणि आपुलकी दाखवायची आहे,याच उद्देशाने एक घास…भुकेलेल्यांसाठी…असा नवीन उपक्रम युवा स्मिता फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल चव्हाण यांनी सुरू केला होता…हा रोटी डे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे…गावागावात गल्ली-गल्लीत युवा स्मिता फाउंडेशनला युवक जोडले जात आहेत…व आपापल्या परीने रोटी डे साजरा होतो आहे. दरवर्षी चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे, टेडी डे, रोज डे साजरे केले जातात…तसेच14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे या दिवशी अनेक युवक आपल्या प्रेयसीला गुलाबाचे फुल देऊन प्रपोज करतात… आणि आपले  प्रेम व्यक्त करतात..पण भुकेलेल्यांसाठीही रोटी डे साजरा करण्याची वेळ आज आली आहे…युवा स्मिता फाउंडेशनचे सदस्य भुकेल्या जीवांवर प्रेम करतात…मानवतेवर प्रेम करतात…महाराष्ट्राची भूक भागली पाहिजे,अशी संकल्पना फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल चव्हाण यांची आहे… त्यांच्या या संकल्पनेस विविध स्तरातून प्रचंड प्रतिसाद लाभला आहे…