पत्रकार सागर जैन यांना प्रेस क्लबचा ‘ॲक्टिव्ह जर्नालिस्ट’सन्मान… १३ वर्षांपासून सागर जैन यांचे पत्रकारितेत सक्रिय योगदान…

0
38

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

रायगड जिल्ह्यातील पुढारी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सागर जैन यांना प्रेस क्लबकडून ‘ॲक्टिव्ह जर्नालिस्ट’ या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी खोपोली येथील महाराजा सभागृहात होणाऱ्या रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या २० व्या वर्धापन दिन सोहळ्यात हा सन्मान प्रदान केला जाणार आहे…

सागर जैन हे गेल्या १३ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे. आदिवासी समाजाच्या समस्या, प्रशासनातील त्रुटी, जनतेच्या न्यायासाठी लढा यासारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे.
सागर जैन यांनी विविध नामांकित न्यूज चॅनेल्समध्ये काम केले असून, जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना प्रभावीपणे कव्हर केल्या आहेत…त्यांच्या पत्रकारितेच्या सातत्यपूर्ण कार्याचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे…

सागर जैन यांचा आतापर्यंतचा प्रवास सुरुवातीला कॉलेज संपल्यानंतर ते स्टार रिव्हाईंडर विजू मोरे यांच्या इलेक्ट्रिक दुकानात हेल्पर म्हणून व त्यानंतर मेकॅनिकल म्हणून काम करत करत ते स्वतःचा रिक्षा बॅच काढून रिक्षा ड्रायव्हर म्हणून सुद्धा काम करीत राहिले. त्यानंतर वडिलांसोबत राहून रेशन दुकान सांभाळण्याचा अतिशय उत्कृष्ट अनुभव घेत बँक क्षेत्रात ओळख करून बँकेचा लोन काढून स्वतःचा किराणा दुकान सुरू केला. किराणा दुकान सुरू असतानाच नाकोडा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने त्यांनी स्वतःच्या टुरिस्ट गाड्या उभ्या करत. इतरांच्या गाड्यांना आपल्या माध्यमातून रोजगार दिला. अनेक ड्रायव्हर त्यांच्याकडे शिकून गेले. परंतु काल बदलत गेल्याने घरोघरी फोर व्हीलर गाड्या मिनी बस झाल्याने टुरिस्ट धंद्याचे व्यवसाय कमी झाला परंतु इतक्यावरच गप्प न बसता त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये ओळखीचे असणारे दिनकर खरीवले यांच्या छोट्याशा पाक्षिक वृत्तपत्रांमध्ये कामाला सुरुवात केली. वृत्तपत्र लिहिण्याचा सराव कमी असल्याने व अक्षराला वळण देण्याकरिता माहिती घेण्याकरिता सी डी देशमुख कॉलेजचे प्रोफेसर तुळशीदास मोकळ यांनी मोलाची मार्गदर्शन केले .तसेच या क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली असता अनुभव व ओळख वाढत गेली आणि अजेश नाडकर यांच्या 24 तास महाराष्ट्र फास्ट या यूट्यूब चॅनलला नाडकर यांनी संधी दिली. आणि त्या संधीचा सोना करत त्यांनी युट्युब चैनल वर चांगली पकड केली व त्यानंतर विस्टा न्यूज मराठी या चॅनलला समीर मोरे व दिव्याने मोरे यांनी संधी दिली याही संधीचा चांगला उपयोग करत असताना टीव्ही नाईन चे महबूब जमादार यांच्यासोबत ओळख झाल्याने त्यांनी त्यांच्या टीव्ही नाईन च्या बातम्या करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली त्यानंतर आपले कोकण या न्यूज चॅनलला स्वाती घोसाळकर यांच्या माध्यमातून काही महिने काम करण्याची संधी मिळाली हे सर्व करत असताना यामध्ये माहिती अधिकारी मनोज सानप यांनी या सर्व बातम्या करत असताना नेहमीच मोठे मार्गदर्शन ठरले छोट्या मोठ्या युट्युब चैनल च्या माध्यमातून रायगड मधल्या तळागाळातील बातम्या लोकांना youtube च्या माध्यमातून घरोघरी पोचवण्याचं काम केलं.कोरोनासारखा महाभयंकर आजाराने अख्या जगाला घाबरून घरात बसवले…

अशा या रोगाला न जुमंता संपूर्ण रायगड जिल्ह्यात अचूक बातमी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा काम केला. त्यातच निसर्ग तौऊकते चक्रीवादळामध्ये असो किंवा महाडमध्ये सावित्री नदीला आलेला महापूर असो किंवा कर्जत येथील ईरशाल वाडी दुर्घटना असो या सर्व घटनेच्या इथंबुत बातम्या चा कव्हरेज लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम. करत असतानाच सर्व नागरिकांच्या तळागाळात हृदयात असलेल्या नॅशनल पुढारी न्यूज चैनल ला माझी नियुक्ती करण्यात आली. या पुढारी न्यूज सारख्या मोठ्या चैनल संधी मिळाल्यानंतर आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाल्याने संपूर्ण रायगड मधल्या बातम्या तळागाळातील लोकांपर्यंत अचूक बातम्या गोळा करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना अधिकाधिक ओळख झाली आणि या ओळखीच्या व कामाच्या जोरावर त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून यापूर्वी अनेक वेळा त्यांना सन्मानित करण्यात आले परंतु आज. पुन्हा एकदा रायगड प्रेस क्लबच्या वतीने आयोजित ऍड. जनार्दन पाटील यांच्या स्मृती शोध पत्रिका सन्मान सोहळ्या 14 फेब्रुवारी 20 25 रोजी खोपोली येथे देण्यात येणाऱ्या रायगड प्रेस क्लब ऍक्टिव्ह जनरलिस्ट पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याने सर्व स्तरावर त्यांची कौतुक केले जात आहे. त्यामुळे मी रायगड प्रेस क्लब चे वरिष्ठ पदाधिकारी अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच रोहा प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकारी या सर्वांचा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. की त्यांनी मला या पदाचा मानकरी ठरवला…